Thursday, May 16, 2013

डी. वाय. पाटील कॉलेजवर धडक

 नितीन पडळकर या गरीब घरातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. कॉलेजचे नाव बदनाम होत आहे, म्हणून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये, जर कॉलेज व्यवस्थापनाने दोषींना वाचविण्याचा प्रयत्न केला तर युवा सेनाप्रमुख अदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवा सेनेच्यावतीने आज डी. वाय. पाटील कॉलेजच्या व्यवस्थापनाला देण्यात आला
सहकारी विद्यार्थ्यांच्या जाचाला कंटाळून डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दुसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या नितीन पडळकर या विद्यार्थ्यांने चालत्या लोकलमधून उडी मारून आत्महत्या केली. रॅगिंगच्या या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी युवासेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली  युवासेनेचे सक्रीय सदस्य बाळा कदम , सिनेट सदस्य शशिकांत झोरे,  महादेव जगताप,  पवन जाधव,  युवासेना सचिव सुरज चव्हाण,  उपजिल्हाप्रमुख के. एन. म्हात्रे,  शहरप्रमुख विजय माने,  जिल्हा युवाधिकारी अभिमन्यु कोळी,  शहरसंघटक रोहिणी भोईर,  उपशहरप्रमुख विशाल कोळी,  विभागप्रमुख संतोष मोरे,  उपविभागप्रमुख संजय भोसले,  परिवहन समिती सदस्य श्रीकांत भोईर,  उपजिल्हाधिकरी विशाल विचारे, उपजिल्हाधिकरी  अमित आगवणे,  शहर अधिकारी संकेत लाड,  गिरीष म्हात्रे,  अनिकेत दरेकर,  आदींसह शेकडो युवा आणि शिवसैनिकांनी आज नेरुळ येथील डी. वाय. पाटील कॉलेजवर धडक दिली

यावेळी शिष्टमंडळात सिनेट सदस्य प्रदिप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, सक्रिय सदस्य बाळा कदम, पवन जाधव, जनसंपर्क अधिकारी सुरज चव्हाण आदी उपस्थित होते
 
1) रॅगिंग करणार्‍या गुन्हा दाखल
  .
2) रॅगिंगविरोधात सूचना फलक आवश्यक

3)१० लाख रुपयांची मदत करा